पुणे, ६ ऑगस्ट २०२२: अभिनेत्याचें वक्तव्य हे कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ज्यात हिंदी कलाकार हे कायमच अडकले आहेत. पण यात आता मराठी अभिनेत्यांची भर पडली आहे. नुकतीच अभिनेता सुबोध भावे, याच्या वक्तव्याने खळबळ उडाली होती. नालायक राजकारण्यांना आपणच निवडून देतो. असं नाव न घेता, राजकारण्यांवर सुबोध भावे यांनी टीका केली. पण त्याचे परिणाम असे झाले की नंतर त्यांनी माफी मागितली. त्यातही त्यांनी माझ्या वाक्याचा विपर्यास केला जात असून, जर मी चुकीचे वक्तव्य केले असेल तर माफी मागतो, असं सांगितलं.
याच वक्तव्याच्या गदारोळात आता अभिनेता शशांक केतकर याने उडी मारली आहे. हर घर तिरंगाच्या निमित्ताने नुकतेच एक गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यात अमिताभ बच्चन, आशा भोसले, सोनु निगम असे दिग्गज कलाकार या गाण्यात दिसत आहे. यावर शशांक केतकरने विरोध दर्शवला आहे. त्याने सांगितले की बक्कळ पैसा मिळवणाऱ्या या सेलिब्रिटीज ना घेऊन केलेल्या या गाण्याला विरोध करा. अशा छोट्या गोष्टींतून उर्जा मिळते, हे सगळे सपशल खोटे आहे. प्रत्येकाच्या घरात तिरंगा फडकावा, हे सांगावे लागते, हे दुर्देव आहे. अशा शब्दात त्याने विरोध केला आहे.
या आधी अभिनेत्री कंगना रानौत हिने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे केवळ भीक होती, असं वक्तव्य कंगना रनौत हिने केलं. तिच्या या वक्तव्याचे अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं होतं. त्यामुळे ते दोघेही वादात होते.
केवळ अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून समाजात वावरताना लोकशाही आहे, म्हणून कसंही बोलंणं हे सेलिब्रिटींना शोभत नाही. त्यातूनही दिग्गज अभिनेता म्हणून वावरताना समाजाचं भान त्यांनी ठेवणं जास्त गरजेचं आहे. काही लोकं तर अभिनेत्यांना देव मानण्याचा मूर्खपणाही करतात. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य आपल्याला शोभते काय असा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. तरुण पिढीचे विचार हे कदाचित जाज्वल्य असतात. पण त्यातून नक्की केवळ विरोध करावा म्हणून किंवा स्वत:ला फुटेज मिळावे, या हेतूने बोललेले वक्तव्य नक्कीच करिअरला घातक ठरु शकते. त्यामुळे प्रसिद्ध व्यक्ती म्हणून बोलताना सेलिब्रिटींनी विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस