पारशी नववर्ष; जाणून घेऊया हा समाज भारतात कसा आला

मुंबई, १६ऑगस्ट २०२२: पारशी समुदाय हा भारतातील अल्प संख्यांक समुदायांपैकी एक मानला जातो. भारतातील इतिहासात पारशी समुदायाला एक विशिष्ट असं स्थान आहे. आज पारशी नववर्षानिमित्त भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य बदलणाऱ्या काही पारशी बांधवांची माहिती आपण घेऊ.

पारशी समुदाय हा मुळचा इराणमधील पोरस प्रांतातील रहिवासी होता. पण अरब मुस्लिमांच्या आक्रमणामुळे आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ पारशी समुदायावर आली होती. या नंतर जीव मुठीत धरुन पारशी बांधव भारताच्या दिशेने निघाले. गुजरात राज्यातील दुर्गम ठिकाणी एक गाव आहे.

उदवाडा या परिसरातील संजन समुद्रकिनाऱ्यावर पारशी समुदायातील लोकांनी १२०० वर्षापुर्वी आपलं पहीलं पाऊल ठेवलं. भारतीय इतिहासात उल्लेखनीय योगदान देणारे पारशी बांधवांबद्दल जाणून घेऊ.

१) टाटा कुटुंबीय:

त्यांचं भारतीय इतिहासात प्रचंड मोठं नाव आहे. टाटा समूहाची गणना देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये केली जाते.

२) होमी जहांगीर भाभा:

भारताच्या अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक म्हणून डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना ओळखलं जातं.

३) दादाभाई नौरोजी

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे पहिले आशियाई नेते होते.

४) सायरस आणि आदर पुनावाला यांना आपण सिरम इन्सिट्युटचे संस्थापक म्हणून ओळखतो.

केवळ यादीतील वरील व्यक्तींनीच नव्हे तर अनेक पारशी बांधवांनी भारतीय इतिहासात आपलं योगदान दिलं आहे. त्यानी सुरु केलेल्या कामाचा वारसा जपत हे काम आजही तितक्याच जोमाने करत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा