जावयाला सांभाळायला एवढं करावंच लागतं, सुशील कुमार शिंदेंचं विधान

सोलापूर, १९ सप्टेंबर २०२२ : सोलापूर मध्ये महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार सुशील कुमार शिंदे यांना देण्यात आला त्यावेळी सुशील कुमार शिंदे बोलतात की मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. हे एक चांगलं काम मी केलं त्यामुळेच मी पुन्हा निवडून येऊ शकलो पण आता लोकांना मी केलेल्या कामाचा विसर पडला आहे.

तसेच या दरम्यान शिंदे पुढे बोलतात की, माझा जावई गुजराती आहे. माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला आरक्षण दिले. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावेच लागते, असे शिंदेंनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला घरचा आहेर दिलाय.

काँग्रेस पक्षातील नाराजी एक एक नेत्यांकडून बाहेर येऊ लागली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी स्व:पक्षावरच टीका करत पक्षाला घरचा आहेर दिलाय.

सुशील कुमार शिंदे बोलतात की मी मुख्यमंत्री असताना मला पक्षातील लोकांनीच कटकारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून काढले. असा आरोप ही सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदावरून हटवलं आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवलं, मला कसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं, काय कारस्थान झालं हे मी विसरू शकत नाही, असंही ते म्हणालेत.

सुशील कुमार शिंदे यांनी आरक्षणासंदर्भात खुलासा करत गुजराती समाजाला माझा जावई गुजराती म्हणून मी आरक्षण दिलं. आता जावयाला सांभाळायचं म्हटल्यावर हे सगळं करावंच लागतं असे विधान केल्यानंतर तसेच स्व पक्षावर टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा