केंद्रीय मंत्री नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२ : भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिला आहे. आदिश बंगल्याबाबत याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. बंगल्याचं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले आहेत. निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याच्या आत बांधकाम पाडण्याचा निकाल आज (दि.२६) दिला आहे.

नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू इथं अधिश नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणी मुंबई कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती.

अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत १० लाखांचा दंड ठोठावला असून मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगीही दिली आहे. या निर्णयाविरोधात नारायण राणेंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली असून हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे राणेंना हा मोठा दणका मानला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा