डिजीटल क्रांतीचा सोहळा साजरा … आता 5G सेवा मिळणार ग्राहकांना

दिल्ली, १ ऑक्टोबर, २०२२ : ज्याची सगळेजण चातकाप्रमाणे वाट पहात होते, त्या 5G चे आज भारतात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जीओचे संचालक मुकेश अंबानी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे ऑनलाईन उपस्थित होते. अखेर पंतप्रधान मोदींनी 5G सेवेचे लोकार्पण केले. ही आजच्या काळातली डिजिटल क्रांती म्हणावी लागेल. देशातल्या १३ राज्यात 5G ही सेवा सुरु होणार असून १३ राज्यात महाराष्ट्र आणि शहरात पुण्याचा समावेश आहे.

5G चे फायदे

१. इंटरनेट सेवा जलद गतीने सुरु होणार
२. 5G साठी नवीन सीमकार्डची गरज नाही. त्यामुळे कार्ड बदलावे लागणार नाही.
३. 4G च्या तुलनेत दहा पट वेगाने ही सेवा सुरु राहणार
४. २० GBPS वेगाने ही सेवा सुरु राहणार
५. ऑनलाईन व्हिडिओ बफर होणार नाही
६. ऑनलाईन व्यवहार गतीमान होणार
७. व्हिडिओ कॉलही वेगाने चालणार
८. इंटरनेटचा स्पीढ १०० पटीने वाढणार
९. सिनेमा केवळ दहा सेकंदात डाऊनलोड होणार
१०. आरोग्य क्षेत्रात इंटरनेट सेवा पोहोचल्याने स्वास्थ सेवा खऱ्या अर्थाने पुढारणार

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशाच्या विकासात 5G सेवा ही अत्यंत मोलाची कामगिरी करणार असुन त्यामुळे देश तंत्रज्ञानाच्या प्रगतीत पुढे जाईल आणि देशाला वेगळी ओळख मिळेल, असेही पंतप्रधानांनी उद्घाटनाच्या वेळी जनतेला सांगितले. तसेच ही सेवा डिसेंबर २०२३ पर्यंत गावागावांमध्ये पोहोचेल आणि सर्वजण या सेवेचा योग्य लाभ घेऊ शकतील, असे जिओचे संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले.
5G सेवा ही सध्याच्या 4G सेवेपेक्षा महाग असून ती सर्वत्र पोहोचण्यास वेळ लागेल. मात्र, ही सेवा आल्याने जग खऱ्या अर्थाने डिजीटल क्रांतीच्या दिशेने पाऊल उचलत आहे आणि हेच खरे भारताचे यश म्हणावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा