पुणे, १५ ऑक्टोबर २०२२ : आज सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या, आशिया कपच्या फायनल मध्ये भारतीय महिला संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत सातव्यांदा ट्रॉफी वर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने ८ विकेट्सने हा सामना जिंकला, या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज अशा दोन्ही विभागाने मोलाचे योगदान दिले.
दरम्यान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला नाही. श्रीलंकेच्या संघाला २० ओव्हरमध्ये फक्त ६५ धावा करता आल्या, श्रीलंकेकडून रणवीराने १८आणि ओशादी रणसिंघे हीने १३ इतकी धावसंख्या केली.
भारताकडून रेणुका सिंहने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तरच स्नेहा राणा आणि राजश्री गायकवाड यांनी तिला साथ देत प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने नाबाद ५१ धावा ठोकल्या, तिच्या व्यतिरिक्त हरमनप्रीत कौरने नाबाद ११ धावा केल्या, या दोघांच्या फटकेबाजीमुळे भारताने हा कमी आव्हानाचा सामना सहजरित्या जिंकला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव