मुंबई विमानतळ आज ६ तासांसाठी राहणार बंद

मुंबई, १८ ऑक्टोंबर २०२२: देखभाल दुरुस्तीमुळे मुंबई विमानतळ आज (१८ ऑक्टोबर) ६ तासांसाठी बंद राहणार आहे. या ६ तासांत विमानतळावर कोणत्याही विमानाची हालचाल होणार नाही. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार आहे.

धावपट्टी क्रमांक १४/३२ आणि धावपट्टी क्रमांक ०९/२७ या दोन्ही ठिकाणी देखभालीचे काम केले जाईल. आज केले जाणारे दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतरच्या देखभालीचा भाग असेल.

याआधी १४ ऑक्टोबर रोजी खराब हवामानामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ८ उड्डाणे वळवण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

याप्रकरणी सीएसएमआयएची प्रतिक्रियाही समोर आली आहे. CSMIA कडून सांगण्यात आले की, मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे खबरदारी म्हणून जवळपास ८ उड्डाणे जवळच्या विमानतळाकडे वळवण्यात आली. CSMIA ने आपल्या सर्व प्रवाशांना त्यांच्या संबंधित एअरलाइन्सच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला होता.

सर्व प्रवाशांना याची माहिती देण्यात आल्याचे विमानतळावरून सांगण्यात आले. खराब हवामानामुळे उड्डाणे वळवण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा