अहमदाबाद, १८ ऑक्टोबर २०२२: राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात दोन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार असल्याची माहिती गुजरातचे मंत्री जितू वघानी यांनी दिली.
राज्यातील सुमारे ३८ लाख गृहिणी डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच सरकारने सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅटमध्ये १० टक्के कपातही केली आहे. यामुळे सीएनजी प्रतिकिलो ६ ते ७ रुपये आणि पीएनजी किलोमागे ५ ते ५.५० रुपये स्वस्त होणार आहे.
डिसेंम्बर मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकी आधी राज्यात आरोप प्रत्यारोपाचे रण पेटले आहे. आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातील नेते प्रचारामध्ये अशा अनेक लोकप्रिय घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने आकर्षक घोषणा केली आहे. वर्षाला दाेन गॅस सिलिंडर माेफत दिल्यामुळे नागरिकांना १ हजार काेटींचा दिलासा मिळेल, असे मंत्री वघानी म्हणाले.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे