१२५ डेसिबलपेक्षा मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यास मनाई, पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड पुणे, २३ ऑक्टोबर २०२२ : महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ नुसार, पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात, २३ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते २३ नोव्हेंबर २०२२ च्या रात्री पर्यंत, म्हणजेच तब्बल १ महिना, ध्वनी प्रदूषण करणारे फटाके उडवण्यास रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे. दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हे आदेश दिले.

कोणत्याही रस्त्यावर किंवा रस्त्यापासून ५० फुटांच्या आत कोणतेही फटाके उडवणे किंवा फायर बलून आकाशात सोडणे किंवा फेकणे अगर रॉकेट अग्निबाण सोडणे, उडवणे असे कृत्य करणे, तसेच एखादा फटाका उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर, १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या महिन्याभराच्या कालावधीत, १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या आणि १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणारे सर्व साखळी फटाके उडवण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. साखळी फटाके ५० ते १०० तसेच १०० व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११०, ११५ व १२५ डेसिबलपेक्षा जास्त असता कामा नये. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम १३१ प्रमाणे कायदेशीर शिक्षेस पात्र राहील.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा