नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२२: इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामधील मॅच नेहमीच अटी तटीचे असते. भारताप्रमाणेच पाकिस्तानी संघातही अनेक यशस्वी खेळाडू आहेत. पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला क्रिकेटचा इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जाते.
वसीम अक्रम याने २००३ मध्ये खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे उदाहरण गोलंदाजीचे अप्रतिम प्रदर्शन म्हणून दिले जाते. वसीम अक्रम हा केवळ पाकिस्तानातच नव्हे तर जगभरात एक यशस्वी गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळाडूंचे प्रेरणास्थान बनला आहे. सर्वोत्तम गोलंदाजांची चर्चा झाली की वसीम अक्रम याचे नाव असतेच. मात्र वसीम अक्रमने भाऊक होत पाकिस्तानी चाहत्यांवर नाराज व्यक्त केलीये. पाकिस्तानी क्रिकेटचा हा त्यांची सध्याची पिढी मला मॅच फिक्सर म्हणून संबोधते असे आक्रमने सांगितले.
वाईड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सशी संवाद साधताना अक्रम बोलत होता की,”जेव्हा ऑस्ट्रेलिया,इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि भारतातील वर्ल्ड इलेव्हन चा विचार केला जातो जेव्हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा विचार केला जातो तेव्हा माझे नाव नक्कीच घेतले जाते.मात्र सध्या माझ्यावर होणारी टीका ही निंदनीय आहे. कोणताही विचार न करता आत्ताची पिढी काहीही बोलत आहे, अश्लील कमेंट करून मला ट्रोल करत आहे. तो मॅच फिक्सर आहे अशी कमेंट प्रत्येक वेळी मला दिसत आहे. लोकांचा कमेंट्स ने दुखावण्याचा फेस मधून मी कधीच बाहेर आलो आहे पण माझा कुटुंबावर माझ्या मुलांवर याचा परिणाम होऊ शकतो असे अक्रम ने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे