नवी दिल्ली; ३० नोव्हेंबर २०२२ देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता २.५ रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, मंगळवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी नवी दिल्लीपासून ८ किमी पश्चिमेला हा भूकंप झाला, ज्याची खोली जमिनीच्या खाली ५ किमी होती.
- नोव्हेंबर महिन्यातील तिसरा भूकंप
या महिन्यात दिल्लीत झालेला हा तिसरा भूकंप आहे. यापूर्वी नोव्हेंबरच्या सुरुवातीला नोएडा आणि गुरुग्राममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या भूकंपाची खोली सुमारे १० किमी होती. तर १२ नोव्हेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टल स्केल एवढी होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.