शेतमालकाच्या त्रासामुळे मजूर महिलेची विष प्राशन करून आत्महत्या

बीड, ११ डिसेंबर २०२२ : बीडमध्ये शेतमालकाच्या त्रासाला कंटाळून एका मजूर महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे‌. या महिलेचे शेतमालकाबरोबर प्रेमसंबंध होते, अशी माहीती समोर आली आहे‌. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने शेतमालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना बीडच्या केज पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे‌. पापा इनामदार (रा. भवानी माळ, धारूर रोड, केज) असे आरोपी शेतमालकाचे नाव आहे. तर मृत २२ वर्षीय महिलेचा पती इनामदारकडे मे २०१२ पासून सालगडी म्हणून काम करतो. आणि तिथेच शेतात आपल्या पत्नीसह राहत होते.

इनामदार याने सालगड्याच्या पत्नीशी जवळीक निर्माण करून प्रेमसंबंध बनवले, हे पतीला समजले. त्याने पत्नीला समजाविण्याचा प्रयत्न केल्यावरही तिचे संबंध सुरूच होते. सुरवातीचे दिवस चांगले गेले. नंतर इनामदार व महिलेच्या पतीची रोजच भाडंण होऊ लागले. या सर्वांचा त्रास शेतमालक या महिलेला देत होता.

याचा तिला मानसिक त्रास होऊ लागल्याने तिने उंदीर मारण्याचे विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने केज पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. यावरून पापा इनामदारवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेत आणखीन तपास करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा