पुणे, १ जानेवारी २०२३ : हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून खवय्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. मासळी, मटण, चिकन खरेदीसाठी खवय्यांची बाजारात गर्दी झाली होती.
पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी येथील मासळी बाजारात सकाळपासून खवय्यांची खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. घरगुती ग्राहकांसह हाॅटेल व्यावसायिकांकडून मासळीला चांगली मागणी होती. खवय्यांकडून पापलेट, कोळंबी, सुरमई, रावस, हलवा, ओले बोंबील या मासळीला चांगली मागणी होती, असे रेतीले मासे विक्रेत्यांनी सांगितले. मटणाला चांगली मागणी राहिली. चिकनचे दर स्थिर होते. केटरिंग व्यावसायिक, हाॅटेलचालक; तसेच घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती, असे पुणे, पिंपरी बाॅयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले.
मटण, चिकन, मासळीचे किलोचे दर पुढीलप्रमाणे :
मटण : ७०० रुपये
चिकन : २२० रुपये
पापलेट : ७०० ते १८०० रुपये
हलवा : ५०० ते ६५० रुपये
सुरमई : ४०० ते ५५० रुपये
ओले बोंबील : २०० ते ३६० रुपये
कोळंबी : १६० ते ८०० रुपये
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील