जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

जम्मू, १७ फेब्रुवारी २०२३ :जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे आज पहाटे ५ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र कटरा पासून ९७ किमी अंतरावर आहे. भूकंपामुळे कुठलीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, शुक्रवारी पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्रबिंदू ३३.१० अक्षांश आणि ७५.९७ रेखांश होता. भूकंपाच्या धक्क्यांनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी सिक्कीममध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी होती. तर महिनाभरापूर्वी डोडा आणि किश्तवाडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा