नवी दिल्ली, ४ मार्च २०२३ : भारत सरकारने नॅनो युरियानंंतर आता नॅनो डीएपीला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी आज ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. नॅनो युरियानंतर नॅनो डीएपीलाही भारत सरकारने मान्यता दिली आहे. आता एक बँग डीएपी, एका बाटलीमधून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
नॅनो डीएपी प्रति ५०० मिलीलिटरची बाटली ६०० रुपयांना मिळेल. एक बाटली डीएपीच्या एका बॅगच्या बरोबरीची असेल. त्यांची किंमत सध्या १३५० रुपये आहे. दरम्यान, भारताला परकीय चलनाची बचत होण्यास मदत होणार आहे; तसेच सरकारी अनुदानात लक्षणीय घट होईल. सरकारच्या या निर्णयानंतर नॅनो डीएपीच्या व्यावसायिक उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे; तसेच लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
शेतीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्याचा परिणाम पर्यावरणीय प्रदूषणासह मातीच्या सुपीकतेवर होत आहे. त्यामुळे खतांचा वापर कमी करण्यासाठी नॅनो तंत्रज्ञान फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘आयएफएफसीओ’ या कंपनीने काही वर्षाऔपूर्वी नॅनो युरिया सुरू केला. त्यामुळे बॅगमधून मिळणारी खते आता ५०० मिलीलिटर बाटलीमधून मिळत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर