फलटण, १५ मार्च २०२३ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेवाडी येथे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. त्याचबरोबर ‘एक पाऊल पुढे’ या योजनेअंतर्गत श्री संत तुकाराम महाराज ग्रामीण वाचनालयाचे उद्घाटन झाले.
मानेवाडी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचे वर्ग एकचे अभियंता शुभम शिंदे हे उपस्थित होते. यावेळी मानेवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर, मुंबई येथील मुंबईकर मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास तरडप केंद्राचे केंद्रप्रमुख पांडुरंग धुमाळ, सौ. स्वाती धुमाळ, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र बोराटे, प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका निशा मुळीक, पुष्पलता बोराटे, राजेंद्र मुळीक, प्रवीण मोरे, संजय बोबडे, विठ्ठल शिंदे, बापूराव मुळीक, शिवाजी माने, संजय देशमुख, सतीश जाधव आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते श्री संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाचे निमित्त साधून ‘एक पाऊल पुढे’ या उपक्रमांतर्गत श्री संत तुकाराम महाराज वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर जिल्हा परिषद, मानेवाडी व अंगणवाडी, मानेवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास मानेवाडीचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मानेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलका नलवडे यांनी केले. सूत्रसंचालन अजित जगताप यांनी केले, तर आभार आशा बोराटे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार