हर्णे, २५ मार्च २०२३: महाराजांनी आपल्या सर्व लढाया डोंगराळ भागातच लढल्या. यामध्ये महत्त्वाची भूमिका होती ती किल्ल्यांची. केवळ डोंगराळ भागच नाही तर याला जोड जलदुर्गांची देखील होती. मात्र शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजां नंतर किल्ल्याची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली. जी आजही चालूच आहे. गरज आहे ती त्यांचं संगोपन करण्याची. हेच काम गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीनं होताना दिसतंय.
गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर स्वच्छता मोहिमा राबवत असते. याला अनुसरून किल्ले सुवर्णदुर्ग या जलदुर्गावर संस्थेच्या युवक युवतींनी स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी गडाच्या तटबंदीवरती वाढलेली झुडपं व छोट्या झाडांच्या मुळ्या काढण्यात आल्या, बुरजांवर वाढलेलं गवत काढण्यात आलं. या मोहिमे बद्दल विशेष सांगायचं झालं तर पहिल्या मोहिमे वेळी किल्ल्या बाहेर अस्थाव्यस्थ अवस्थेत २ तोफा संस्थेच्या दुर्गसेवकांना दिसल्या होत्या. त्यातील एक पहिल्या मोहिमेच्या वेळी गडाच्या आत नेऊन सुरक्षित जागी ठेवण्यात आली व दुसरी तोफ १९ मार्च रोजी किल्ल्या मध्ये आत नेऊन सुरक्षित जागी ठेवण्यात आली.
मोहिमेमध्ये एकून ४० दुर्ग सेवक सेविका सहभागी झाले होते. या मोहीमेला हर्णे ग्रामपंचायत सरपंच- राजेंद्र धाडवे, डाॅक्टर- रोहन पिंपळे, स्थानिक ग्रामस्थ तसेच भारतीय पुरातत्व विभागाचे कर्मचारी यांचं चांगलं सहकार्य लाभलं. अध्यक्ष- शुभम रानम उपाध्यक्ष- राजेश काळे संपर्क प्रमुख- प्रतिक गमरे, शुभम फाटक , अभिजीत तिर्लोटकर पंकज पुजारी, विठ्ठल टाले आणि ईतर मावळे सहभागी होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी