नवी दिल्ली, २९ मार्च २०२३: राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात सोमवारी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांसाठी भावनिक विषयावर बोलणं काँग्रेसने टाळावं, असा सल्ला शरद पवार यांनी गांधी कुटुंबीयांना दिला. २०१९ मध्ये पवारांनी वैचारिकदृष्ट्या भिन्न असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना एकत्र आणून महाविकास आघाडीची स्थापना केली होती.
राहुल यांनी सावरकरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर महाराष्ट्रातील आघाडीत फूट पडल्याचं दिसून आलं. ज्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केलाय. याबाबत त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी या दोघांशीही चर्चा केली. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व्ही डी सावरकर यांना लक्ष्य केल्याने राज्यातील विरोधी आघाडीला फायदा होणार नाही, असं पवारनी ठणकावून सांगितलं. या विषयावर त्यांचे मोठं नुकसान होऊ शकते.
या बैठकीत विरोधी पक्षांचे अठरा पक्ष सहभागी झाले आहेत. राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर अपात्रतेवर काँग्रेसशी
एकजूट दाखवणं हा त्यामागचा उद्देश होता. मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी आपण सरकारला घाबरत नाही, त्यामुळं माफी मागणार नाही, कारण त्यांचे नाव गांधी आहे, सावरकर नाही आणि गांधी कधीच कोणाची माफी मागत नाहीत, असं विधान केलं होतं.
राहुल यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱ्यांना आमचा पक्ष खपवून घेणार नाही, असं सांगितलं. त्यामुळं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खरगे यांनी सोमवारी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सूरज गायकवाड