अमेरिका, १४ एप्रिल २०२३: अमेरिकेतील एका डेअरी फार्मला लागलेल्या आगीमुळे भयंकर स्फोट झाला, ज्यामुळे हजारो गायींचा जागीच मृत्यू झाला. मृत गायींची संख्या सुमारे १८,००० आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गायींचा मृत्यू झाल्याने तेथे खळबळ उडाली आहे. स्फोटाशी संबंधित छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टेक्सास प्रांतातील साउथफोर्क डेअरी फार्म या फॅमिली डेअरी फार्ममध्ये ही घटना घडली. स्फोटामुळे मोठ्या उंचीपर्यंत धुराचे ढग होते. हा स्फोट इतका भीषण होता की तो कित्येक किलोमीटर दूरपर्यंत दिसत होता. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
डेअरी मालकाने या घटनेबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकन पोलिसांनी म्हटले आहे की आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दल घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले आहे.
मारल्या गेलेल्या गायींमध्ये होल्स्टीन आणि जर्सी गायींचा समावेश आहे. माहितीनुसार, प्रत्येक गायीची किंमत २,०००$ होती, म्हणजेच कंपनीचे नुकसान लाखो डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. टेक्सासमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरे मरण पावण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु क्वचितच एवढ्या गुरांचा एकाच आगीत मृत्यू झाला असेल.
न्यूज अनकट प्रतीनिधी: केतकी कालेकर