अक्षय्य तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्याच्या महानैवेद्य

पुणे, २२ एप्रिल २०२३: साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११ हजार आंब्याच्या महानैवेद्य दाखविण्यात आला आहे. यानंतर ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये या आंब्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला फुले व आंब्यानी सजवण्यात आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यत रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयूग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

आज गणपती बाप्पांना ११ हजार आंब्याच्या महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे. ही आंब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा