उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून सावध रहावे, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

मुंबई,२५ मे २०२३ : भाजपकडून जे ईडीचे डाव टाकले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी चे नेते भाजपच्या गळाला लागणार आहेत. तर काँग्रेस नेते नाना पटोले कधी जहाल तर कधी मावळ भाषा बोलत आहेत. त्यामुळे पटोले यांची भूमिकाही तपासून घ्यावी. आणि उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी पासून सावध राहावे. आम्ही तुम्हाला सावध करत आहोत असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीची भांडुप येथे संविधान बचाव सभा आयोजित केली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही हल्ला चढवला. रविवारी नवीन संसद भावनांचा उद्घाटन सोहळा होत आहे. परंतु विरोधी पक्षांनी यावर बहिष्कार टाकला आहे. जर आमचे सरकार सत्तेत आले, तर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुन्हा संसद भवनाचे उद्घाटन करू. असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

केंद्र सरकारने, दिल्ली सरकार विरोधात अध्यादेश काढला आहे. त्यावरही आंबेडकर आपले मत व्यक्त केले. आमची अरविंद केजरीवाल यांना सहानुभूती आहे. परंतु आम्ही त्यांच्यासोबत आहोत असे नाही,असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचा ही समाचार घेतला. राष्ट्रवादी म्हणते वंचितला जागा देणार नाही. पण आम्ही त्यांना जागा दिल्याच नाही. ज्याला सत्तेत जायचं आहे, त्याला आम्हाला सोबत घेतल्याशिवाय सत्तेत जाता येणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा