पुणे, ६ जुलै २०२३: महापालिकेकडून शहरी गरीब योजना तसेच अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी योजना मात्र अजून बासतानाच गुंडाळून ठेवल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे जेष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीलाही विलंब होत असल्याने महापालिलेकेने शहरातील ज्येष्ठांना दुर्लक्षित केले आहे असे दिसते.
महापालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षांपूर्वी डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी मोफत आरोग्य योजना सुरू करण्यात आली होती. मात्र नवीन आर्थिक वर्षात या योजनेसाठी तरतूदच करण्यात आली नाही. गेल्या चार महिन्यांमध्ये योजना सुरू करण्याबाबत महापालिकेला अनेकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. दुसरीकडे शहरी गरीब योजना आणि अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेसाठी मात्र मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.
महापालिकेच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य द्यावे, असे आरोग्य हक्क कार्यकत्यांचे म्हणणे आहे. आता ही योजना सर्व ज्येष्ठ नागरिकांना न देता आथिर्कदृष्ट्या मागास व्यक्तींना देण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी योजनेचे फलकही अद्याप ‘जैसे थे’ आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर