नवी दिल्ली, १३ जुलै २०२३ : मागच्या पाच ते सहा दिवसापासून दिल्लीत जोरदार पाऊस सुरु आहे. अद्यापही पाऊस सुरु आहे, सततच्या पावसामुळे दिल्लीत काही भागात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून पाऊस विश्रांती घेत पडत आहे. परंतु दिल्लीत सखत भागात सगळीकडे पाणी साचले आहे. यमुना नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. दिल्लीतील पूरस्थिती पाहून अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाणी साचलेल्या भागात सगळ्या सरकारी आणि खासगी शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.ही माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सगळ्यांना दिली आहे. ज्या भागात पाणी साचले आहे, त्या भागातील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत..
दिल्लीत अनेक भागात पाणी साचले असल्यामुळे सिविल लाइंस येथील १० आणि शाहदरा परिसरातील सात शाळा बंद करण्यात येणार आहेत. दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून सिविल लाइंस झोन मधील १० शाळा, शहादरा परिसरातील ६ शाळा आणि शहादरा (उत्तर) भागातील एक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे.
उत्तर भारतात दिल्ली आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळे दिल्लीतील शाळा बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. उत्तराखंडमध्ये सुध्दा आज सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पंजाब राज्यात सुध्दा १६ शाळा पुढचे तीन दिवस बंद राहणार आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री हरजोत सिंह बैंस यांनी ट्विटच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर