मुंबई, १७ जुलै २०२३ : विधानसभा पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ झाला. सभागृहाचे कामकाज सुरूवात होताच विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या पश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. मात्र या उत्तरावर समाधानी न झालेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँगेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पाऊस आणि पीकपाणी संबंधित चिंता व्यक्त केली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. अशातच राज्यात बोगस बियाणे देण्याचे प्रमाण वाढ झाली आहे. या टोळीवर तात्काळ कारवाई करावी. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा राज्यात पाऊस कमी आहे. ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यांचा एक आराखडा शासनाने तयार केला आहे. या प्रश्नी केवळ विरोधकांनाच काळजी आहे असे नाही, सत्ताधाऱ्यांनाही शेतकऱ्यांची काळजी आहे. असे फडणवीस यांनी सांगितले. मात्र या उत्तरावर समाधानी न झालेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग करत सरकारचा निषेध केला.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर