ब्रिजभूषण आज होणार कोर्टात हजर, कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

नवी दिल्ली, १८ जुलै २०२३: क्रीडा आणि राजकारण क्षेत्रातून मिळालेल्या वृत्तानुसार, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना आज म्हणजेच मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज ब्रिजभूषण यांना समन्स बजावले आहे. १६०० पानांच्या चार्जशीटमध्ये अनेक मोठे खुलासे झाले आहेत. ६ कुस्तीपटूंच्या लैंगि शोषणाच्या प्रकरणाची आज या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

१५ जून रोजी दिल्ली पोलिसांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाची सुनावणी १ जुलै रोजी झाली होती. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने लैंगिक छळप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेउन ब्रिजभूषण यांनी न्यायालयात हजर राहणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. ब्रिजभूषण व्यतिरिक्त WFI चे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचे नाव देखील आरोपींमध्ये आहे.

आरोपपत्रात पैलवानांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेली साक्ष, हा महत्त्वाचा आधार मानण्यात आला आहे. त्याचबरोबर ब्रिजभूषण यांच्या विरोधात जवळपास ७ साक्षीदार सापडले आहेत. यासोबतच लैंगिक शोषणाच्या कथित ठिकाणी त्याच्या उपस्थितीचे पुरावेही मिळाले आहेत. आरोपपत्राच्या पहिल्या सुनावणीत न्यायालयाने ते खासदार-आमदार न्यायालयाकडे वर्ग केले होते. सोमवारी कोर्टाने दिल्ली पोलिसांना आरोपपत्राची प्रत तक्रारदार कुस्तीपटूंना देण्याचे आदेश दिले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा