Truecaller चं AI Assitance फीचर लाँच

पुणे, २० जुलै २०२३ : सध्या जगात टेलिकॉम क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे. 2g 4g आणि आता 5g सुरु आहे, त्यातच फेक कॉल सेंटर देखील चालू होते. त्यामुळे स्पॅम कॉल्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. साधारणतः प्रत्येक व्यक्तीला दिवसातून एक तरी स्पॅम कॉल येतोच. Truecaller ने स्पॅम कॉल्सपासून मुक्त होण्यासाठी एक नवीन AI पॉवर्ड फीचर आणले आहे. त्यासोबतच कंपनीने AI असिस्टंट फीचर लॉन्च केले आहे.

Truecaller फीचरच्या माध्यमातून लोकांना कॉल उचलायचा की नाही हे सांगण्यासाठी मशीन, लर्निंग आणि क्लाउड टेलिफोनीचा वापर करते. सध्या AI असिस्टंट Android यूजर्ससाठी उपलब्ध आहे. यूजर्स, अॅपची नवीन व्हर्जन डाऊनलोड करून हे फीचर वापरू शकतात. Truecaller चे नवीन फीचर हे ऑटोमॅटिक कॉल रिसीव्ह करते आणि यूजर्सना कॉल रिसीव्ह करायचा की नाही हे सांगण्यासाठी कॉलरच्या आवाजाचे ट्रान्सक्राईब करते. जर तुम्ही हे फीचर चालू केले असेल आणि तुम्ही फोनपासून लांब असाल, तर एखादा स्पॅम कॉल आल्यावर Truecaller स्वतः कॉल रिसीव्ह करतो आणि तो स्पॅम असल्यास तुम्हाला कळवते. भारताचे चे मॅनेजिंग डायरेक्टर ऋषित झुनझुनवाला म्हणाले की, आतापर्यंत Truecaller वर तुम्हाला कोण कॉल करताहे हे समजत होत, पण आता तुम्ही Truecaller असिस्टंटला तुमच्या वतीने कॉलरशी संवाद साधू देऊ शकता. जेणेकरून तुम्हाला अनावश्यक स्पॅम कॉल्स उचलावे लागणार नाहीत.

नव्याने सुरु करण्यात आलेलं AI Assistance फीचर चालू केल्यावर जेव्हाही तुम्हाला कॉल येईल, तेव्हा तुम्ही ते असिस्टन्समध्ये ट्रान्सफर करू शकता. जेणेकरून AI तुमच्याऐवजी तुमचा कॉल रिसीव्ह करेल आणि कॉल रिसीव्ह केल्यानंतर AI कॉलरचा आवाज टेक्स्टमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि तुम्हाला कॉल उचलायचा की काय उत्तर द्यावे की नाही हे सांगण्यास मदत होईल.

सध्या, हे फीचर Android यूजर्ससाठी १४ दिवसांच्या विनामूल्य चाचणीवर उपलब्ध आहे. टेस्टिंग संपल्यानंतर, तुम्ही Truecaller प्रीमियम प्लॅनचा भाग म्हणून १४९ रुपये प्रति महिना आहे. सध्या तरी हा प्लॅन प्रमोशनल डील अंतर्गत ९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Truecaller AI असिस्टंट फीचर सुरुवातीला भारतात इंग्रजी, हिंदी आणि ‘हिंग्लिश’ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा