आजही मुसळधार पावसाची शक्यता, ‘रेड अलर्ट’मुळे रायगडमध्ये शाळा-कॉलेज बंद राहणार

मुंबई, २६ जुलै २०२३ : मान्सूनने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला वेढले आहे. महाराष्ट्रातील रायगडमधील जिल्हा प्रशासनाने आज, बुधवार, २६ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्याचवेळी हवामान खात्याने रायगडसाठी ‘रेड’ अलर्टही जारी केला आहे.

विशेष म्हणजे, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रायगड, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज म्हणजेच बुधवार २६ जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर दुसरीकडे मुंबई, पालघर आणि ठाण्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने या भागात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

याआधी IMD, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवारी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला होता आणि महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी २७ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टही जारी केला होता.

यासह, आयएमडीच्या मूल्यांकनानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. IMD मुंबईच्या अंदाजानुसार, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा