तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ८ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

तामिळनाडू, २९ जुलै २०२३: तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यात आज सकाळी फटाक्यांच्या कारखान्याच्या गोदामात झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. पझायापेट्टई भागात रवी नावाच्या एका फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला, अशी माहिती कृष्णागिरीचे पोलिस अधीक्षक सरोज कुमार ठाकरे यांनी दिली.

कारखान्यातील आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पसरली. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. या दुर्घटनेटतील ८ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. काही जखमींना उपचारासाठी जवळच्या सहकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गंभीर जखमींना उपचारासाठी कृष्णागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मंगळवारी विरुधूनगर जिल्ह्यातील शिवकाशी सिटी येथे फटाके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या स्फोटांत दोघांचा मृत्यू झाला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा