नवी दिल्ली, १ ऑगस्ट २०२३ : मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरूच आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत हजर राहून मणिपूर हिंसाचारावरुन निवेदन करावे अशी मागणी लावून धरली आहे. मणिपूर हिंसाचारावरुन लोकसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर संसदेत चर्चा करण्यात येणार असून, याची तारखी ठरली असल्याची माहिती समोर आली आहे.
विरोधकांकडून संसदेत सरकारविरोधी सादर करण्यात आलेल्या अविश्वास ठराव प्रस्तावावर लवकरच चर्चा होणार आहे. संसदेत ८ ऑगस्ट आणि ९ ऑगस्टला विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून, १० ऑगस्ट रोजी या प्रस्तावाला उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.
मणिपूर हिंसाचारावरुन जगभरात चर्चा होत आहे. दरम्यान विरोधी पक्षांकडून संसदेत अविश्वास ठराव आणल्याने, सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखला म्हणजेच पीएम मोदींना संसदेत दाखल केलेल्या प्रस्तावावर बोलावे लागणार आहे, पीएम मोदींना बोलतं करण्यासाठीच विरोधकांकडून केलेली ही खेळी असल्याचे अनेक तज्ज्ञांनी यापूर्वी म्हटले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर