नाशिक तोफखाना केंद्रातील ३०४ जवान सैन्यात दाखल

नाशिक: नाशिक मधील देवळाली कॅम्प मधील भारतीय तोफखाना केंद्रातील ३०४ जवानांची तुकडी भारतीय सैन्यामध्ये दाखल होत आहे. ४४ आठवड्यांच्या खडतर प्रवासानंतर दिमाखदार सोहळ्यात हे जवान भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत. हे जवान भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये तैनात होणार आहेत.
याजमाना गणर्स असे म्हटले जाते कारण यांना भारतीय तोफखाना केंद्रांमध्ये तोफांचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय सैन्यामध्ये वेगवेगळ्या तोफा चालवण्याचे काम हे जवान करत असतात. येथे त्यांना ४४ आठवडे खडतर प्रशिक्षण दिले जाते. कोणत्याही वातावरणामध्ये व परिस्थितीत लढा देण्यासाठी यांना तयार केले जाते. यातील १९ आठवडे यांना सैन्य दलाचे बेसिक ट्रेनिंग दिले जाते व उर्वरित काळात तोफा कश्या हटलाव्यात, इतर शास्त्र आणि शारीरिक ट्रेनिंग ही दिली जाते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा