सध्या मंगळ ग्रहावर दिवस लहान होत असल्याची बाब, शास्त्रज्ञांच्या मते मंगळाच्या भ्रमणाचा वेग वाढला

न्यूयॉर्क, ११ ऑगस्ट २०२३ : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती स्वतःच्या निर्धारित कक्षेतून परिक्रमण करतात. पृथ्वीही सूर्याभोवती फिरते व त्याचबरोबर स्वतःभोवतीही फिरत असते. त्यामुळे दिवस आणि रात्रीचे गणित मांडता येते. पृथ्वीच्या शेजारी असलेल्या मंगळाबाबतही असेच घडते. सध्या मंगळावर दिवस लहान होत असल्याची बाब समोर आली आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार मंगळाचे हे फिरणे चार मिलीएआरसी सेकंडने वाढले आहे.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या इनसाईट मास लॅंडर मोहिमेतून समोर आलेल्या माहितीनुसार ते मंगळाचा अचूक वेग टिपण्यात यशस्वी झाले आहेत. मंगळाची वाढलेली गती एका मंगळ वर्षांमध्ये एक मिलीसेकंद अंशाच्या बरोबरीची आहे. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनूसार ही आकडेवारी इनसाईट मास लॅंडरवर लावण्यात आलेल्या रेडिओवरून मिळते.

अदयापही मंगळाचा वेग नेमका का वाढला आहे ही बाब मात्र लक्षात येऊ शकलेली नाही. पण इथून पुढे या घटनेवर लक्ष ठेवण्यात येणार असून, येत्या काळात त्यामागची कारणे लगेचच लक्षात येतील असे संशोधकांचे मत आहे. फक्त मंगळच नव्हे, तर पृथ्वीच्या फिरण्याचा वेगही वाढल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा