मुंबई, २० ऑगस्ट २०२३ : राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा चीनच्या भारतीय भूमीवर कब्जा केल्याचा मुद्दा समोर आला आहे. सरकार नेहमीच याचा इन्कार करत आले आहे. मात्र विरोधकांनी नेहमीच सरकारला घेरले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या लडाख दौऱ्यावरील विधानाचे समर्थन करताना म्हटले की, संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांनी हे मान्य करावे.
चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला असून त्याचे पुरावेही समोर आले आहेत, असे उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांनी ते मान्य केले नाही तर तो भारतमातेवर अन्याय आहे असे वाटते. राहुल गांधी जे बोलतात तर ते विचारपूर्वक केलेले स्टेटमेंट असते.
काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना लडाखमधील १४२७० फूट उंचीवर पंगत्सो तलावाच्या काठावर श्रद्धांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर राहुल गांधी यांनी चीनवरही हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, इथे सगळे म्हणतायत की चिनी सैन्य घुसले आहेत. पंतप्रधान म्हणतात की, इथे कोणीच घुसखोरी केलेली नाही, मात्र पंतप्रधानांचा हा दावा खरा नाही. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर चीनच्या घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड