मुंबई, ७ सप्टेंबर २०२३ : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट ‘जवान’ आज, ७ सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो सकाळी ६ वाजता सुरू झाला आहे. सकाळचा कार्यक्रम पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. मुंबईतील गेटी सिनेमाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांनी ढोल-ताशांच्या गजरात ‘जवान’च्या रिलीजचे जल्लोषात स्वागत केले.
एटली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘जवान’ चित्रपटात नयनतारा शाहरुख खानच्या सोबत दिसली आहे. याशिवाय विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोणही खास भूमिकेत दिसणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जवान’ चित्रपटाची १३ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. तर चित्रपट पहिल्या दिवशी जगभरात १२५ कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन करू शकतो. माहितीनुसार, ‘जवान’ हा चित्रपट जवळपास ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. जो जवळपास ५५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड