लातूर २१ नोव्हेंबर २०२३ : नांदगाव पाटी ते शिवनिमोड या मार्गावर दहा किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. याचा निषेध म्हणुन vs युवा पॅन्थर संघटनेच्या वतीने विनोद खटके यांच्या नेतृत्वाखाली जानवळचे अध्यक्ष मारोती कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले.
या दहा किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र दुरूस्ती झाली नाही. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने, दापक्याळ शिवणीमोड परिसरातील सोमवारी सकाळी रस्ता रोको करण्यात आला.
यावेळी तलाठ्यांनी आंदोलनस्थळी येत निवेदन स्वीकारून रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले, निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाचे उच्च अधिकारी आले नाही आले. रस्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोनही बाजुला ट्रॅफिक जॅम झाले होते. हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिक सुद्धा संतप्त झाले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख