धाराशीव १६ डिसेंबर २०२३ : धाराशीव जिल्हयात तब्बल ९ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीचा धोरणाचा मोठा फटका धाराशिव जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. मार्केट मध्ये ५ हजार रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा आता १५०० ते १८०० रुपयेवर आलाय. शेतकऱ्यांचे गुंतवलेले पैसे, औषध,मजुरी निघत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. पिकांवर शेतकऱ्यांचे गुंतवलेले पैसे, औषध, मजुरी निघत नसल्यामुळे शेतकरी काळजीत पडले आहेत.
नाशिक जिल्हयातील लासलगाव, पुणे येथील गुलटेकडी, बेंगलोर येथील यशवंतपुर, सोलापूर येथील आडत मार्केट मध्ये धाराशिव जिल्हयातील कांदा विक्रीस जातो परंतु भाव घसरल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, किमान ४० रुपये दर दयावा, लाईट बिल माफ करावे, अनुदान दयावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : रहिम शेख