मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीत त्यांचे कुटुंबीय सहभागी…

जालना, २० जानेवारी २०२४ : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरंगे पाटील आज मुंबईकडे आपल्या समाज बांधवांसह जाणार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा आणि शुभेच्छा देण्यासाठी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि त्यांचे वडील शहागडपर्यंत त्यांच्यासोबत पायी चालणार आहेत. आज अखेर मनोज जरांगे पाटलांना मुंबईकडे कूच करण्याची वेळ पडलीच. त्यामुळे सरकारने आता तरी मराठा समाजाचा अंत न बघता समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांच्या परिवारातील सदस्यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढत असलेले जरांगे पाटील गेल्या ७ महिन्यापासून घरी आले नाही हे सांगताना जरांगे यांच्या पत्नीचे अश्रू अनावर झाले. आता हा लढा लवकर संपवा, मराठ्यांना लवकर आरक्षण मिळावे अशी आशा जरांगे परिवाराने केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा