खालापूर, रायगड, २६ जानेवारी २०२४ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी उपसरपंच सुखदेव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गाणी, देशभक्ती गीते आणि कोळीगीतावर नृत्य सादर केले. यावेळी वर्षभरात विविध स्पर्धेत घवघवीत यश मिळवलेला विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अतिशय दुर्गम भागात असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आणि सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे केल्याने ग्रामस्थांनी शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी उपसरपंच सुखदेव भोसले, ग्रामपंचायत सदस्या संगीता संदीप चिंचावडे, मुख्याध्यापिका सविता दारशेवाड, शिक्षिका श्रुतिका चिले, सुनंदा भोसले, रुपाली चिंचावडे, जेष्ठ नागरिक विष्णू चिंचावडे, गबलू भोसले, गणेश आखाडे, मारुती शेडगे, संतोष शेडगे, शैलेश तुपे, संदीप तिकोने, निलेश चिंचावडे, बबन जानकर, प्रकाश आखाडे, एबी इन्फ्रा कंपनीचे विलास भालके, गणपत कोंडभर, एकनाथ कोंडभर, आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे