अखिल फुरसुंगी नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उत्तम चोरघडे,तर उपाध्यक्षपदी उत्तम कामठे यांची निवड

पुणे दि, २० सप्टेंबर २०२४ : अखिल फुरसुंगी नवरात्र उत्सव मंडळाची वार्षिक सभा फुरसुंगी गावातील भैरवनाथ मंदिरात पार पडली. २०२३ सालचा जमाखर्च अहवाल सादर करणे आणि भविष्यात मंडळा मार्फत होणाऱ्या सामाजिक कामाची नियोजनबद्ध योजनेसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अरुण मेमाणे यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षपदासाठी एकूण ४ अर्ज आले होते, परंतु गेल्या ३५ वर्षांपासून उत्तम चोरघडे हे नवरात्र उत्सवाचे सक्रिय सभासद असून सर्वात जुने सहकारी असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी उत्तम कामठे यांची निवड यावेळी मंडळाचे मावळते अध्यक्ष प्रदीप हरपळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मंडळाचे संस्थापक सदस्य संगीत वाजे, नानासाहेब कुठे, नानासाहेब चोरघडे, राजाभाऊ गोसावी,अशोक चंद, सुरेश मोडक, बाळासाहेब हरपळे,रवींद्र चंद,अरुण मेमाणे, सुरेश शेवाळे,अशोक कामठे, रमेश कामठे,दत्ता भाडळे, संदीप कामठे,तानाजी कुठे,योगेश झेंडे,साहेबराव हरपळे, विजय हरपळे,अतुल सरोदे तसेच इतर सभासद आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा