पुणे ९ डिसेंबर २०२४ : महाबळेश्वर स्ट्रॉबेरीवर आधारित विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनचे अनावरण डाक विभागाच्या सचिव वंदिता कौल यांच्या हस्ते नुकतेच मुंबई जी.पो. ओ. येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलचे चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, मुंबई रिजनच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी आणि महाराष्ट्र सर्कलचे डायरेक्टर अभिजित बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुणे पोस्टल रिजनचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जयभाये हे महाबळेश्वर येथून व्हीं.सी द्वारे उपस्थित होते.
महाबळेश्वर आपल्या चवदार आणि रसाळ स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. या स्ट्रॉबेरीची जागतिक स्तरावर असलेली लोकप्रियता आणि महत्त्व लक्षात घेऊन हे विशेष टपाल कॅन्सलेशन जारी करण्यात आले आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी उत्पादनाने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना दिली असून, त्याला भारतीय कृषी क्षेत्रात एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
वंदिता कौल यांनी या कार्यक्रमात महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला गौरव देण्यासाठी डाक विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी म्हणाल्या, “महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचा स्वाद आणि त्याचे व्यवसायिक महत्त्व आज देश-विदेशात प्रसिध्द आहे. यावर आधारित विशेष कॅन्सलेशन जारी करून त्याला एक नवा गौरव मिळाला आहे.” “महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणजे केवळ एक कृषी उत्पादन नाही, तर हे चित्रात्मक कॅन्सलेशन आपल्या शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक आहे. या चित्रात्मक कॅन्सलेशनमुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीचे महत्व अधोरेखित झाले आहे. यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळेल.”
पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी या निमित्ताने महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर प्रकाश टाकला आणि भारतीय पोस्ट विभागाच्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, हे चित्रात्मक कॅन्सलेशन महाबळेश्वर पोस्ट कार्यालयांद्वारे उपलब्ध होईल, ज्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला अधिक व्यापक ओळख मिळेल. हे चित्रात्मक कॅन्सलेशन विविध डाक तिकिटे, कागदपत्रे आणि पोस्टल सामग्रीवर दर्शविले जाईल.”
या अनावरण कार्यक्रमाचे आयोजन मुंबई जी.पो. ओ. येथे करण्यात आले होते. टपाल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान दिले.
न्युज अनकट पुणे प्रतिनीधी