२०१९ मध्ये अनेक प्रत्येक क्षेत्रात अनेक घडामोडी घडल्या. यात नवनवीन टेक्नोलॉजीच्या बाबतीतही अनेक नवनवीन बदल झाले. त्यात यंदाच्या वर्षात लोकांनी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले अँप कोणते हे आपण पाहू या…
◆ Tiktok : टिकटॉक हा अॅप बिजींगच्या ByteDance कंपनीने बनवलेला अॅप आहे. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांवर किंवा डायलॉगवर तुमचे छोटे व्हिडिओ बनवू शकता. काही लोक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकमेकांना चॅलेंजेस देऊ लागले.
◆ NetFlix : वेबसीरिज हा प्रकार सध्या सोशल मिडियावर इतका धुमाकूळ घालत आहे. या वेबसीरिजला डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी नेटफ्लिक्स एक उत्तम माध्यम बनले.
◆ Google Pay : डिजिटल पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी गुगल पे एक उत्तम माध्यम बनले. या अॅपच्या माध्यमातून झटपट ऑनलाईन बँक व्यवहार, शॉपिंग, बिल भरणे अगदी सोपे झाले.
◆ Helo : Helo हे भारतातले बेस्ट सोशल अॅप आहे. ५०००००००+अधिक वापरकर्त्यांसह विनामूल्य डाउनलोड चित्रे/व्हिडिओज शेअरिंग, चॅटिंग आणि मित्र बनविण्याकरिता एक उत्तम भारतीय सामाजिक अॅप आहे.
◆ UTS : डिजिटल माध्यमाद्वारे कॅशलेस पद्धतीने रेल्वे तिकिट काढणे सोपे करण्यासाठी UTS अॅप खूपच फायदेशीर ठरले. हे सरकारी अॅप असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त रक्कम न जाता रेल्वे तिकिटाची मुळात जी किंमत ठरविण्यात आली आहे. तेवढीच रक्कम वापरली जाऊ लागली. यामुळे तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लावण्यापासून रेल्वे प्रवाशांची सुटका झाली.