राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेच्या प्रयत्नांना येणाऱ्या अपयशामुळे राजगुरूनगर शहर समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची विविध कारणामुळे गैरसोई मध्ये वाढ झालेले चित्र सध्या पाहायला मिळते ,
पुणे – नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर हे एक पुण्यापासून जवळ असलेले शहर म्हणून ओळख आहे त्यातच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ म्हणून जुने खेडचे राजगुरूनगर असे नामकरण करण्यात आले. तालुक्यात येत असलेल्या नवनवीन प्रकल्पामुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होत चालला आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजगुरुनगर शहरातील सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात होत्या. यामध्ये पिण्याची फिल्टर पाणी , सांडपाण्याची व्यवस्था, कचरा यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रथम लक्ष पुरवले जात होते. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे नागरी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध होत होत्या. परंतु वाढत्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्नही अपुरे पडू लागले त्यानंतर राजगुरुनगरची ग्रामपंचायत ही नगरपरिषद झाली. नगरपरिषद झाली म्हटल्यावर सुख सोई मिळणार ,नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लागणार अशी भावना नागरिकांनमध्ये झाली मात्र राजगुरुनगर शहरातील सुविधा पुरवण्यासाठी नगरपरिषदेची काहीशी दमछाक होतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा , सांडपाण्याचा प्रश्न , कचऱ्याची विल्हेवाट , उघडी पडलेली गटारे , फुटलेल्या जनवाहिन्या त्यातून रस्त्यालगत येणारे पाणी हे प्रश्न नगरपरिषदे पुढे आव्हान बनू लागले आहे. हे नागरी प्रश्न सोडवण्यासाठी नगर परिषदेकडून प्रामाणिक प्रयत्नही झाले. परंतु वाढती लोकसंख्यामुळे नगरपरिषद ते प्रयत्न अपुरे पडू लागले आहे. त्यातच काही नागरिकांची बेपरवाई त्यामुळे नागरी प्रश्नांची सोडवणूक करणे अवघड बनत चालले आहे. घंटागाडी सोडून बाहेर टाकला जाणारा कचरा त्यातच उघड्यावरती असलेल्या गटारा तील सांडपाणी हे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येणारी दुर्गंधी उघडी वाहणारी गटारे काही ठिकाणी तुंबलेली गटारे या सर्वांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरांमध्ये असलेली अपुरी स्वच्छतागृह त्यांची झालेली दुरवस्था हाई नगरपरिषदेच्या प्रश्न सुटू शकलेला नाही. गावचे सांडपाणी सरळ नदित मिसळून भीमा नदीचे पाणी दूषित होते त्यामुळे नदीकाठच्या पुढील गावच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कचरा उचलण्यासाठी नगरपरिषद घंटागाडी असली तरी अजून व्यापक प्रयत्न व नागरीकांमध्ये शिस्त ची गरज आहे. एकूणच त्यादृष्टीने सांडपाणी आणि कचरा विल्हेवाट आणि शहरातील वाहतूक कोंडी हे तीन प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहतूक कोंडीही राजगुरुनगर ची खरी डोकेदुखी आहे राजगुनगर वाहतूक कोंडीच्या विळख्यात का अडकले याचे उत्तर द्यायचे झाल्यास अतिक्रमण असेच द्यावे लागेल, बाजारपेठेत, वाडा रोड, तिन्हेवाडी रोड, पाबळ रोड , जुना मोटर स्टँड या परिसरात नियम डावलून अतिक्रमण करण्यात आली आहे. मात्र या गोष्टीकडे नगरपरिषद डोळेझाक करत आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीच्या विख्यात राजगुरूनगर शहर अडकले असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते गडई मैदान वरून रस्ता तसेच क्रीडा संकुल च्या बाजूने ही रस्त्याची सोय केली आहे.
परंतु गावातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे हटवणे ,नो पार्किंग करणे वाहने रस्त्यावर लावणे , व्यवसायिक रस्त्यालगत बसने यांच्यावर कठोर निर्बंध लावणे गरजेचे आहे. राजगुरुनगर शहरातील समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषद , नागरिक , पोलीस आणि महसूल व बांधकाम विभाग अधिकारी व पदाधिकारी यांच्या एकत्रित येण्याची खरी गरज आहे. यातूनच राजगुरुनगर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा अतिक्रमणाचा प्रश्न व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यात मदत होणार हे मात्र निश्चित .