नवी दिल्ली: बिपीन रावत यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी युद्ध स्मारकात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर लष्कर प्रमुखपदावरून आज सेवानिवृत्ती घेतली आहे. याशिवाय साऊथ ब्लॉकवर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. बिपिन रावत यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सर्व सैनिकांना शुभेच्छा दिल्या. माध्यमांशी बोलताना बिपीन रावत म्हणाले की मनोज मुकुंद देशाच्या सैन्यास पुढे नेतील अशी पूर्ण आशा आहे.
ते म्हणाले की चीफ ऑफ आर्मी स्टाफ फक्त एक पोस्ट आहे, त्या व्यक्तीला सैन्याच्या सर्व सैनिकांनी पाठिंबा दर्शविला असतो, त्याच्या सहकार्याने देशाची सेना पुढे सरकते. बिपिन रावत हे फक्त एक नाव आहे, जेव्हा एखाद्याला पद मिळते तेव्हाच त्यामध्ये तेवढे सामर्थ्य असते बाकी तो एक सामान्य व्यक्ती असतो. तसेच त्याला सर्व सैनिकांचा पाठिंबाही असतो याशिवाय तो शून्य असतो.
बिपीन रावत यांनी यावेळी सांगितले की, आता नवीन प्रमुख येतील, ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील. मी लष्कर संरक्षण प्रमुख होईन हे मला माहित नव्हते, आतापर्यंत मी फक्त लष्कर प्रमुख म्हणून काम करत होतो. ते म्हणाले की आपल्या कार्यकाळात सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे त्यांच्यासाठी एक मोठे पाऊल आहे.
जनरल मनोज मुकुंद नरवणे हे त्यांच्या जागी पुढचे लष्करप्रमुख असतील. भारत सरकारच्या वतीने जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले संरक्षण प्रमुख घोषित केले गेले आहे.