कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ निमित्त शाळा, कॉलेज बंद

कोरेगाव: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आज, एक जानेवारी रोजी गर्दी होणार असल्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या भागातील कंपन्या सुरू राहणार आहेत. १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आले आहे. हा अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने; तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.

यासाठी अपर १० पोलिस अधीक्षक, ३२ पोलिस उपनिरीक्षक, १२१ पोलिस निरीक्षक, ३०८ सहायक पोलिस निरीक्षक, यांच्यासह पाच हजार पोलिस कर्मचारी, १२ सीआरपीएफ कंपन्या, १२०० होमगार्ड, १४ बीडीडीएस पथके; तसेच पोलिस स्वयंसेवक व समता दलाचे स्वयंसेवक मिळून सुमारे १० हजार पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कंपन्या बंद ठेवण्याबाबत कोणीही मागणी केली नसल्यामुळे कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा