जालन्यात महासंस्कृती महोत्सवाचे पाच दिवसीय आयोजन…

जालना, ११ जानेवारी २०२४ : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत विविध प्रांतातील कला, संस्कृतीचे जतन, संवर्धन, स्थानिक कलाकारांना व्यासपीठ तसेच स्वातंत्र्य लढयातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.

महासंस्कृती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रभारी अपर जिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व विभागप्रमुख उपस्थित होते.

राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महासंस्कृती महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित केला जाणार आहे. शासन निर्णयान्वये जालन्यात महोत्सवाचे आयोजन व सुयोग्य नियोजनासाठी जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा