मुंबई, २ ऑक्टोंबर २०२०: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज मधील रिटेल व्यवसायात अबू धाबी स्टेट फंड ‘मुबाडा इन्व्हेस्टमेंट को’ १.४ टक्के हिस्सा मिळवण्यासाठी ६,२४७.५ कोटी रुपये गुंतवतील. रिलायन्स रिटेलमध्ये गेल्या तीन आठवड्यांतील ही चौथी मोठी गुंतवणूक घोषणा आहे. असं कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तत्पूर्वी, सिल्व्हर लेक’चे सह-गुंतवणूकदार आणि जनरल अटलांटिक यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक जाहीर केली.
यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी रिलायन्सनं सांगितलं होतं की, खासगी इक्विटी कंपनी सिल्व्हर लेक’ची सहकारी गुंतवणूकदार कंपन्या रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) मध्ये १,८७५ कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. यामुळं कंपनीत त्यांची एकूण गुंतवणूक ९,३७५ कोटी रुपये झाली आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये आरआरव्हीएलच्या सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेलमधील गुंतवणूकदारांचे हित लक्षणीय वाढले आहे. सिल्व्हर लेक व्यतिरिक्त रिलायन्स रिटेल’नं अनुक्रमे अमेरिकन कंपनी केकेआर अँड सी आणि खाजगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिककडून अनुक्रमे ५,५५० कोटी आणि ३,६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, “रिलायन्स रिटेल व्हेंचर’मध्ये मुबाडला यांचं महत्त्वपूर्ण गुंतवणूकदार म्हणून स्वागत झाल्यानं मला आनंद झाला. मुबाडलासारख्या मोठ्या संस्थेबरोबर भागीदारी करणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या रिटेल क्षेत्रातील लाखो किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि दुकानदारांना बळकट करण्याच्या आमच्या मोहिमेवर त्यांच्या विश्वासाचे आम्ही समर्थन करतो.”
कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “देशभरात पसरलेल्या रिलायन्स रिटेल लिमिटेड’च्या सुमारे १२ हजाराहून अधिक स्टोअरमध्ये अंदाजे ६४ कोटी खरेदीदार दरवर्षी येतात. हा देशातील सर्वात मोठा आणि वेगवान वाढणारा रिटेल व्यवसाय आहे. रिलायन्स रिटेल हा देशातील सर्वात फायदेशीर रिटेल व्यवसाय देखील आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे