न्यूयॉर्क : ७ सप्टेंबर ,२०२०
कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पसरलेला आहे. रोज नवनवीन विक्रम मोडले जात आहे. यातच आज आणखी एक दुःखद घटना घडली आहे. प्रख्यात लेखिका आणि प्रसिद्ध लेखक आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. मीना देशपांडे यांना कोरोनाची लागण झाली होती आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
निधन झाल्याची दुःखद बातमी महेश केळुसकर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे शेअर केली आहे. मीना देशपांडे या ज्येष्ठ आणि महान साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या.
त्यांच्यावर अमेरिकेतील जॉर्जिया मध्ये उपचार सुरू होते .आणि स्थानिक वेळेनुसार ६ सप्टेंबर २०२० ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांच्या थोरल्या भगिनी गिरीश पै यांची पुण्यतिथी होती.
दरम्यान, आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा, पपा – एक महाकाव्य, ये तारुण्या ये, हुतात्मा कादंबरी, महासंग्राम कादंबरी, मॅरिलीन मन्रो, मी असा झालो . ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे