पुणे, २७ सप्टेंबर २०२२ : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) च्या वतीने आज देशातील विविध राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अनेक ठिकाणांवर पुन्हा छापे टाकण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ, गुजरात, कर्नाटक आणि आसाममध्ये NIA छाप्यांमुळे PFI च्या संबंधित लोक खवळले आहेत. या कारवाईत संघटनेशी संबंधित १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात तपास यंत्रणेने इंदूर आणि भोपाळमध्ये छापे टाकले. पीएफआयच्या तीन सदस्यांना इंदूरमधून अटक करण्यात आली आहे. यात तौसीफ अहमद, युसूफ मौलानी, दानिश गौरी यांचा समावेश आहे. त्याचवेळी अब्दुल रौफला भोपाळमधून अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी पीएफआयशी संबंधित ३० जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, जालना आणि परभणी येथेही PFI च्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.तर मराठवाड्यातून २१ जणांना अटक करण्यात अली आहे. या कारवाईत एटीएस आणि स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे. NIA केंद्रीय एजन्सीच्या माहितीवरून ATS आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
अलीकडेच २२ सप्टेंबर रोजी १५ राज्यात, PFI कार्यालयावर NIA च्या तब्बल २०० अधिकाऱ्यांनी छापेमारी केली, तर यात १०० हून अधिक जण टेरर फंडिंग च्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहेत, तर या प्लॅनची अतिशय सिक्रेट पद्धतीने आखणी केली होती. तर एकाच वेळी १५ राज्यांमध्ये १५० ठिकाणी छापा टाकला आणि दिल्लीत PFI प्रमुख परवेज अहमद यालाही अटक करण्यात अली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजेपर्यंत ८ राज्यांमध्ये २०० ठिकाणी छापे टाकून १७० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. PFI सरकारी संस्था, नेते, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्या संघटनेला लक्ष्य करण्याचा विचार करत आहे. पीएफआयचे कार्यकर्ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवल्यानंतर संतप्त झाले आहेत.
टेरर फंडिंग आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी PFI संघटना ED च्या रडावर आहे. तर या छापेमारीमुळे येत्या काही दिवसात PFI या संघटनेवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे