मुंबई, 11 जानेवारी 2022: शेअर बाजारात प्रवेश केल्यानंतर पेटीएमला वाईट दिवस येत आहेत. प्रथम, कंपनीच्या IPO ची कामगिरी खराब होती, त्यानंतर शेअर्सच्या किमती सतत घसरत राहिल्या. सोमवारच्या व्यवहारादरम्यान पेटीएमचा शेअर 12शे रुपयांपेक्षा जास्त खाली गेला. आता धोका आहे की येत्या काळात तो 900 रुपयांपर्यंत घसरू शकतो.
प्रथमच 1,200 रुपयांच्या खाली लक्ष्य
ब्रोकरेज फर्म मॅक्वेरी सिक्युरिटीज इंडियाचा अंदाज आहे की आगामी काळात कंपनीचे तिमाही निकाल आधीच्या अंदाजापेक्षा कमी असू शकतात. हे लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने पेटीएम शेअर्सची टारगेट किंमत 900 रुपये केली आहे. यापूर्वी 1,200 रुपयांचं टारगेट दिलं होतं. पहिल्यांदाच एका ब्रोकरेज कंपनीने पेटीएम शेअर्सचं टारगेट 1,200 रुपयांच्या खाली ठेवलंय.
अंडरपरफॉर्म रेटिंग कायम
Macquarie ने पेटीएम स्टॉकसाठी अंडरपरफॉर्म रेटिंग देखील कायम ठेवली आहे. हा अंदाज अशा वेळी आला आहे जेव्हा पेटीएमचा शेअर आधीच उच्चांकावरून 40 टक्क्यांनी तुटला आहे. IPO नंतर लिस्टिंग होताच पेटीएमचा स्टॉक इश्यू किमतीवरून 1,955 रुपयांपर्यंत घसरला होता. यानंतर कंपनीचे शेअर्स अद्याप लिस्टिंग किमतीच्या जवळपास पोहोचलेले नाहीत.
शेअर्स 1,200 रुपयांच्या आले खाली
सोमवारी पेटीएमचा शेअर 1228 रुपयांच्या घसरणीसह उघडला आणि दुपारी 12.50 वाजता 1,200 रुपयांच्या खाली आला. दुपारी 12.50 वाजता, स्टॉक सुमारे 3.70 टक्क्यांनी घसरून 1,185.05 रुपयांवर आला, जी त्याची नवीन निम्न पातळी आहे. या घसरणीमुळं गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. हा स्टॉक कुठं जाऊन सपोर्ट घेईल हे समजत नाही.
त्यामुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय.
हे लक्षात घेण्यासारखं आहे की पेटीएमची ऑपरेटर कंपनी One97 कम्युनिकेशन्स 18 नोव्हेंबर 2021 रोजी सूचीबद्ध झाली होती. त्याची इश्यू किंमत 2,150 रुपये होती, जी आता 1,200 रुपयांच्या खाली गेलीय. म्हणजेच, लिस्टींगच्या दिवसापासून हा स्टॉक त्याच्या इश्यू किमतीपासून 965 रुपयांनी घसरलाय. याचा अर्थ असा की ज्यांना IPO मध्ये एक लॉट शेअर्स वाटप करण्यात आलं होतं त्यांचं आतापर्यंत 5,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे