पुणे, ८ मार्च २०२१: ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’ २७ मार्च २०२१ रोजी आपल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची सुरुवात करत आहे. आपल्या विविध प्रकल्पांच्या शुभारंभाचे औचित्य साधून आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज राज्यातील वेगवेगळ्या भागातील गरजू शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे सौर पंप (सोलर पंप) मदत म्हणून देणार आहे.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा साधनं, शिक्षण क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, हॉस्पिटॅलिटी यांसारख्या विविध क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत. भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळकटी देण्यासाठी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज देखील महत्वाची भूमिका पार पाडणार आहे.
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज ने याआधी देखील लॉक डाऊन च्या काळात वैद्यकीय कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थांचे किट तसेच इतर उपयोगी वस्तूंचे वाटप करून आपले सामाजिक दायित्व निभावले होते. आपल्या प्रकल्पांच्या या शुभारंभ दिनी यंदा `आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज` ` ओमा फाउंडेशन` अंतर्गत पंचवीस गरजू शेतकऱ्यांना सौर पंप वाटप करणार आहे. विशेष म्हणजे कंपनी ग्रीन एनर्जी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये देखील काम करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे