आशियातील सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प मुंबईत

मुंबई, ७ मे २०२३ : मुंबई महानगरपालिकेकडून शहरांच्या हद्दीत आशियातील सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यात ओल्या कचऱ्यावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून कॉम्प्रेस बायोगॅस तयार केला जाणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून प्रस्ताव आल्यानंतर हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

महानगर लिमिटेडच्या सहकार्यातून पालिका हा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज एक हजार टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. २०२२ मध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सीबीजी प्रकल्पांचे उद्धाटन केले होते. सध्या तो आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यात ३०० टन धानाच्या कचऱ्यापासून ३३ टन गॅस दररोज तयार केला जातो.

सध्या मुंबईत ६ हजार टन घन कचरा गोळा होतो. त्यापैकी ३ हजार ५०० टन ओला कचरा आहे. याबाबत महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दररोज ६ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पांची क्षमता असेल. दररोज मुंबईत गोळा होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी एक तृतियांश कचऱ्यावर या प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल. शहरातील कचरा प्रक्रिया करून त्याचा सदुपयोग करण्याच्या कल्पनेतून हा प्रकल्प उभा राहणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा